SSC-HSC Result 2025: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो तयार रहा! मे महिन्यात ‘या’ तारखेला लागणार निकाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ एप्रिल ।। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची निकालाची प्रतीक्षा लककरच संपणार आहे कारण निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे. महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी-बारावीच्या निकालाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीचा निकाल येत्या १५ मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

दहावी आणि बारावीची परीक्षा होऊन एक महिना झाला. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी टेन्शन फ्री झाले होते पण आता लवकरच निकाल लागणार असल्यामुळे ते चिंतेत देखील आले आहेत. बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची तयारी जोरदार सुरू आहे. पेपरची तपासणी अंतिम टप्प्यात आहे. अशामध्ये निकालची तारीख देखील समोर आली आहे. येत्या १५ मे रोजी दहावी आणि बारावीचा निकाल लागणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही शक्यता वर्तवली आहे.

साधारणत: बारावीचे निकाल हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीचे निकाल हे जूनच्या पहिल्या आठवड्यात लागतात. मागच्या वर्षी बारावीचा निकाल २१ मे रोजी लागला होता. तर दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला होता. पण यावर्षी दहावी आणि बारावीचा निकाल लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी तयार राहावे असे सांगितले जात आहे.

दहावी आणि बारावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पाहू शकता. यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांच्या हॉल तिकीटाचा नंबर असणे आवश्यक आहे. दहावी आणि बारावीचा निकाल तुम्हाला कोण-कोणत्या वेबसाइटवर पाहयला मिळणार हे घ्या जाणून….

– mahahsscboard.in

– mahresult.nic.in

– hscresult.mkcl.org

– msbshse.co.in

– mh-ssc.ac.in

– sscboardpune.in

– sscresult.mkcl.org

– hsc.mahresults.org.in

असा चेक कराल निकाल –
– विद्यार्थ्यांनो सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.

– होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.

– क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे अचूक नाव टाका. त्यानंतर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.

– हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *