महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० एप्रिल ।। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातून अतिशय मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला मंत्रिपद मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एक मंत्रिपद मिळू शकते. शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रीरंग बारणे आणि श्रीकांत शिंदे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.
दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही एक मंत्रिपद दिले जाईल, असे सांगण्यात येतेय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागणार असलय्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.