महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ एप्रिल ।। विदर्भातील उष्णतेची लाट आणखी तीव्र झाली आहे. बारापैकी आठ शहरांचे कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले आहे. चंद्रपूरने ४५.६ अंश सेल्सिअस तापमानासह केवळ भारतातच नव्हे, तर जगातील सर्वात उष्ण शहर म्हणून स्थान मिळवले आहे. जागतिक तापमानाची नोंद ठेवणाऱ्या ‘एल डोराडो’ या संकेतस्थळाने ही माहिती जाहीर केली आहे.
चंद्रपूरसह विदर्भातील इतर शहरांमध्येही तापमानाने उच्चांक गाठला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या माहितीनुसार, चंद्रपूरने यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमान नोंदवले आहे. विदर्भातील इतर शहरांमध्येही तापमान ४३ अंशांपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून, दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. हवामान विभागाने २४ एप्रिलपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.
विदर्भातील तापमानाने उच्चांक गाठला असून, अमरावती (४४.६ अंश), अकोला (४४.१ अंश), नागपूर (४३.६ अंश), वर्धा आणि यवतमाळ (४३.४ अंश) येथेही पारा ४३ अंशांवर आहे. मराठवाड्यात परभणी (४२.२ अंश), बीड (४१.७ अंश) आणि छत्रपती संभाजीनगर (४०.९ अंश) येथे तापमान ४० अंशांपेक्षा जास्त आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर (४३ अंश), मालेगाव आणि जळगाव (४२ अंश) येथेही उष्णता तीव्र आहे. पुणे शहरातही ४२ अंश तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
चंद्रपूरचा पारा 45.6 अंशावर
देशात तापमानासाठी कुप्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरात आज 45.6 अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली. हे राज्यातील सर्वाधिक तापमान आहे. काल 44.6 अंशाची नोंद झाली होती, तर आज त्यात पुन्हा एका अंशाची भर पडली. पारा चढू लागल्याने लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून, प्रशासनाने 27 तारखेपर्यंत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हे तापमान आणखी पाच सहा दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
भारतातील सर्वात हॉट ३ शहरे कोणती?
विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. चंद्रपूरने ४५.६ अंश सेल्सिअस तापमानासह जगातील सर्वात उष्ण शहराचा ‘मान’ मिळवला आहे. जागतिक तापमान नोंदणाऱ्या ‘एल डोराडो’ संकेतस्थळानुसार, चंद्रपूर हे जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे, तर ब्रह्मपुरी (४५ अंश) आणि ओडिशातील झारसुगुडा (४५.४ अंश) अनुक्रमे तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हवामान विभागाने २४ एप्रिलपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.
हवामान विभागाचा अलर्ट काय?
हवामान विभागाने सांगितले की, यंदा प्रथमच एप्रिलमध्येच तापमान ४५SyS 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. सोमवारी चंद्रपूर आणि अकोल्यात पारा ४५ अंशांवर पोहोचला होता. बुलडाणा वगळता विदर्भातील सर्व शहरांत तापमान ४१ ते ४२ अंशांवर आहे. पुढील तीन दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना दुपारी बाहेर न पडण्याचा, पाणी पिण्याचा आणि हलके कपडे घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाने उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे.