आता मुंबईतही….; 1 मे पासून नागरिकांना मिळणार ही सुविधा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ एप्रिल ।। लोकल, बेस्ट आणि मेट्रो हे तिन्ही मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे वाहतुकीचे पर्याय आहेत. प्रवाशांना आता मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीसाठी एकाच तिकिटावर प्रवास करता येणार आहे. त्यासाठीची यंत्रणा मे महिन्यात प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

मुंबईकरांना एकाच तिकीटावर लोकल, मेट्रो, मोनोरेल आणि बेस्टने फिरता येणार आहे. ही सुविधा 1 ते 15 मे दरम्यान मुंबईत सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ही घोषणा केली आहे. 15 जूनच्या आत ही सुविधा एमएमआरमधील सर्व शहरांत पुरवली जाणार आहे. मुंबईतील या सुविधेसाठी सध्या तात्पुरत्या स्वरुपात चाचणी सुरू आहे. लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी आणण्यात येणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. मुंबई वन कार्ड हे मल्टीमोडल स्मार्ट कार्ड असणार आहे. मुंबईकरांना एकाच कार्डद्वारे विविध प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेता येणार आहे. यामुळं मुंबईकरांचा प्रवास अधिक सोयीचा होणर आहे.

मुंबई वन कार्डची वैशिष्ट्ये
हे कार्ड लोकल ट्रेन, मुंबई मेट्रो, मोनोरेल आणि सार्वजनिक सेवांसाठी वैध असेल. तसंच, या कार्डवर टॅप केल्याने पेमेंट करण्यास मदत होईल. या कार्डमुळं प्रवाशांना एकाट तिकिटाने मल्टी-मोडमध्ये प्रवास करता येईल. म्हणजेच पॉइंट अ ते पॉइंट ब पर्यंत ट्रेन, मेट्रो आणि बसने एकाच तिकीटाने प्रवास करता येईल.

हार्बर मार्गावर एसी लोकल
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर लवकरच एसी लोकल सुरू करण्यात येणार आहे. एक ते दीड महिन्यात नवी एसी लोकल ताफ्यात येणार असून, ती हार्बर मार्गावर चालविण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ध्या हार्बरवर 12डब्याच्या 614 नॉन एसी लोकलच्या फेऱ्या चालवल्या जात आहेत. एसी लोकलच्या नवीन फेऱ्या असतील की काही नॉन एसी फेऱ्यांऐवजी एसी लोकल चालविण्यात येतील, हे अद्याप ठरलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *