महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ एप्रिल ।। लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, एप्रिल महिना संपायला अवघे ६ दिवस उरले आहेत तरीही या योजनेच्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना आतापासून १५०० रुपये मिळणार नाहीत. याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.
या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत पैसे (Ladki Bahin Yojan These women not get benefit)
आदिती तटकरे यांनी २१ एप्रिलला माध्यमांसमोर याबाबत माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की,काही रिपोर्टनुसार ७ लाखांपेक्षा जास्त महिला या इतर योजनांचा लाभ घेतल आहेत. लाडकी बहीण योजनेत १५०० रुपये दिले जातात. जर महिला या इतर योजनेअंतर्गत १५०० रुपयांचा लाभ घेत असतील. तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
तसेच जर दुसऱ्या योजनांमध्ये महिलांना १५०० पेक्षा कमी रुपये दिले जात असतील तर उरलेले पैसे या योजनेअंतर्गत दिले जातील. नमो शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना १००० रुपये दिले जातात. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेत फक्त ५०० रुपये दिले जाणार आहेत.
लाडक्या बहिणींचा हप्ता का लांबतो? (Ladki Bahin Yojana)
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आदिती तटकरेंना लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) हप्ता का उशिरा येतो असा प्रश्न विचारला गेल्या. त्यावर त्या म्हणाल्या की, आमची टीम ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. बँकेची काही कागदपत्रे, आधार लिंक याबाबत काही समस्या आहेत. काही महिलांना पैसे देण्यात आले आहेत. काही महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत. त्यांना लवकरात लवकर पैसे मिळतील.