महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ मे ।। सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदीची बातमी आहे. अक्षय्य तृतीयाच्या सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरामध्ये सतत होणारी वाढ त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण येत होता. सोन्याचे दर १ लाखापार गेले होते. तर चांदी देखील महागली होती. पण अक्षय्य तृतीयेनंतर सोनं-चांदींच्या दरात घसरण सुरू झाली आणि सलग तिसऱ्या दिवशी देखील दर कमी झाले त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार, २४ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅमने कमी झाले आहे. २ मे २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर २२ रुपयांनी कमी झाला आणि तो प्रति ग्रॅम ९,५१० रुपयांवर आला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर आता ८,७५५ रुपये प्रति ग्रॅम झाला आहे जो मागील दिवसापेक्षा २० रुपयांनी कमी आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर १६ रुपयांनी कमी झाला आहे. १८ कॅरेट सोन्यासाठी ७,१६४ रुपये प्रति ग्रॅम मोजावे लागतील.
तर १० ग्रॅमनुसार सोनं खरेदी करण्यासाठी किती रूपये मोजावे लागणार हे देखील माहिती असणं गरजेचे आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ९५,५१० रुपये, २२ कॅरेट सोन्याची किंमत ८७,५५० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत ७१,६४० रुपये आहे. मागील दिवसाच्या तुलनेत प्रत्येक कॅरेट सोन्याच्या दरामध्ये काही प्रमाणात घसरण झाली आहे.
सोन्याचे दर जरी कमी झाले असले तरी देखील चांदीचे दर मात्र स्थिर राहिले आहेत. २ मे रोजी भारतात १ किलो चांदीचा भाव ९८,००० रुपये आहे. ज्यामध्ये कालच्या दिवसापेक्षा कोणताही बदल झाला नाही. १०० ग्रॅम चांदीचा भाव ९,८०० रुपयांवर स्थिर राहिला आणि १० ग्रॅमचा दर ९८० रुपयांवर स्थिर राहिला आहे.
तर एक दिवस आधी म्हणजे १ मे २०२५ चांदी प्रति किलो २००० रुपयांनी घसरून ९८,००० रुपयांवर गेली होती. ३० एप्रिल २०२५ रोजी १ किलो चांदीचा भाव १,००,००० रुपयांवर पोहचला होता. ज्यामध्ये १०० ग्रॅमची किंमत १०,००० रुपये आणि १० ग्रॅमची किंमत १००० रुपये होती.
मुंबई, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये सोन्याचे आजचे दर किती वाचा –
२४ कॅरेट – ९५,१०० प्रति १० ग्रॅम
२२ कॅरेट – ८७,५५० प्रति १० ग्रॅम
१८ कॅरेट – ७१,६४० प्रति १० ग्रॅम