महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ मे ।। नवीन आर्थिक वर्ष २०२५-२६ सुरु झाले आहे. या वर्षी आयटीआर फाइल करण्याची प्रक्रिया कधी सुरु होणार असा प्रश्न कररदाते विचारत आहेत. लवकरच इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची प्रोसेस सुरु होणार आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने २९ एप्रिल रोजी ITR-1 आणि ITR-4 फॉर्म नोटिफाय केले होते.
मिडिया रिपोर्टनुसार, आयटीआर फाइलिंग प्रक्रिया पुढच्या आठवड्यात सुरु होऊ शकते. आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन ३१ जुलै २०२५ असेल. ही डेडलाइन वाढवण्याची गरज पडू नये, यासाठी पुढच्या आठवड्यात आयटीआर फाइलिंग प्रोसेस सुरु होईल.
इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनरने सांगितले की, नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्याआधीच म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत नोटिफिकेशन दिले जातेल. एप्रिल महिन्यात आयटीआर फाइलिंग प्रोसेस सुरु होते. परंतु यावर्षी आयटीआर फाइलिंगचे नोटिफिकेशन देण्यासाठी जास्त वेळ लागला आहे. यावर्षी आयटीआर प्रोसेसमध्ये बदल करण्यात आले आहेत.
आयकर विभागाने २९ एप्रिल रोजा २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी ITR-1 आणि ITR-4 बाबत नोटिफिकेशन जारी केले आहे. यामध्ये लिस्टेड इक्विटी १.२५ रुपयांपर्यंत लाँगटर्म कॅपिटल गेन टॅक्सवाल्या व्यक्तींना आयटीआर (ITR)फाइल करण्यासाठी सोपे होते.
लाँग टर्म कॅपिटल गेन्सवर टॅक्स भरणाऱ्या करदात्यांना आयटीआर फाइल प्रोसेस सोपी करण्यात आली आहे.यामध्ये जर कोणत्याही व्यक्तीकडे शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये १.२५ लाखांपेक्षा जास्त LTGC असेल तर तुम्ही ITR-1 आणि ITR-4 फाइल करु शकतात.