Pune News : हवामानाची सूचना ७२ तासांपूर्वीच, पिंपरी-चिंचवडमध्ये अर्ली डिटेक्शन सिस्टीम सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ मे ।। पिंपरी-चिंचवड महापालिका आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग, पुणे (सी-डॅक) यांच्या सहकार्याने शहरात प्रगत पर्जन्यमान व पूर अंदाज – पूर्वसूचना प्रणाली (अर्ली डिटेक्शन सिस्टीम) कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे हवामान, वायू गुणवत्ता आणि पूर यांचे अचूक भाकीत करून पालिकेला निर्णयप्रक्रियेत गती आणून प्रभावी उपाययोजना राबविणे शक्य होणार आहे.


भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन’ अंतर्गत या पालिका प्रशासनाने ही प्रणाली विकसित केली आहे. योजनेंतर्गत ‘सी-डॅक’मधील उच्च कार्यक्षमता संगणन गटाने (एचपीसी) भारतीय शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास करून त्यांचे संगणकीय मॉडेल तयार केले आहे. यामध्ये पावसाचे प्रमाण, पूर, वायू प्रदूषण, उष्णतेच्या लाटा या विविध समस्यांचा समावेश आहे. त्या अनुषंगाने ‘मल्टि सेक्टोरियल सिम्युलेशन लॅब’ची उभारणी केली असून, हवामान, जल व्यवस्थापन, आरोग्य, वाहतूक या क्षेत्रांमधील घटक एकत्रितपणे समाविष्ट केले आहेत. आभासी प्रयोगांद्वारे त्यांच्या परिणामांवर अभ्यास केला जात आहे.

याचबरोबर, प्रयोगशाळेच्या मदतीने विज्ञानाधिष्ठित निर्णय सहायक आराखडा विकसित केला जात आहे. त्यामुळे शहर प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मदत होणार आहे. या पद्धतीच्या माध्यमातून पर्यावरणीय समस्या ओळखता येतील. वेळेवर उपाययोजना आखता येतील. शिवाय आपत्ती व्यवस्थापन प्रभावीपणे कार्यरत राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सुरक्षित शहराच्या बांधणीसाठी आपत्तीपूर्व तयारी अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रगत हवामान आणि पूर पूर्वसूचना प्रणाली शहराला अधिक सक्षम, जागरूक आणि आपत्ती निवारणास सज्ज बनवेल. त्या मदतीने धोरणनिर्मितीपासून नागरिकांच्या सुरक्षेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर परिणामकारक निर्णय घेणे शक्य होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिका, आयुक्त तथा प्रशासक, शेखर सिंह यांनी दिली आहे.
राजा तणावात राहील, भेंडवळ घटमांडणीत काय भाकीत वर्तवले?

प्रणालीची ठळक वैशिष्ट्ये –
प्रणालीच्या माध्यमातून ७२ तासांपूर्वीच भाकीत
हवामान, जलविज्ञान, वायू गुणवत्ता समावेश
स्वयंचलित पडताळणी व मूल्यांकन प्रणाली
धोरणकर्ते आणि नागरिकांना सुलभ माहिती
स्थानिक पातळीवर त्वरित निर्णयासाठी मदत
आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम व परिणामकारक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *