महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन – दि. २५ ऑगस्ट – IRDA ने नुकतेच जाहीर केलेल्या नियमानुसार वाहनाचा अपघात विमा नूतनीकरण करते वेळी सदर वाहनाचे PUC चे सर्टिफिकेट बंधनाकारक केले आहे अर्थात ते सर्टिफिकेट मुदतीत असने आवश्यक आहे. वाहनात PUC सर्टिफिकेट ठेवने ही गोष्ट साधी असली तरी ते सर्टिफिकेट मुदतीत आहे की नाही हे लक्षात ठेवने जास्त नीकडीचे ठरणार आहे नाही तर थोड्याशा चुकी मुळे लाखो रुपयाचे नुकसान होवू शकते.
कारण दुर्दैवाने अपघात झालाच तर त्या वेळी PUC मुदतीत असन आवश्यक आहे. नाहीतर दुष्काळात तेरावा महिना अशी गत होवू शकते. म्हणून या पुढे PUC मुदतीत आहे की नाही हे लक्षात ठेवण्या साठी गाडीच्या डॅश बोर्डवरच PUC चे सर्टिफिकेट चिटकवून ठेवने हिताचे राहणार आहे, जेणेकरून त्या कडे दररोज लक्ष राहील……पि.के. महाजन.