महाराष्ट्र 24 : ऑनलाईन : दिनांक 6 मे : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या भूमिकेला जगभरातून पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे चीनने मात्र उलट्या दिशेने प्रवास सुरू केल्याची माहिती आहे. चीनचे राजदूत जियांग झैडोंग यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी (Asif Ali Zardari) यांची भेट घेतली. या भेटीनंतर चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचा दावा पाकिस्ताच्या माध्यमांनी केला आहे. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, त्यामुळे अशा अडचणीच्या वेळी चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे.
चीनचे पाकिस्तानमधील राजदूत जियांग झैडोंग (Chinese Ambassador Jiang Zaidong) यांनी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेतली. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावावर या दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी भारताच्या हल्ल्याचा पाकिस्तान सामना करू शकणार नाही, त्यामुळे चीनने पाकिस्ताला समर्थन द्यावं अशी मागणी झरदारी यांनी केली. त्यानंतर चीनने ते मान्य केलं असल्याचा दावा पाकिस्तानच्या माध्यमांनी केला आहे.
दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्य कायम राहण्यासाठी चीन नेहमीच इस्लामाबादच्या पाठीमागे राहील असा विश्वास चीनने पाकिस्तानला दिल्याची माहिती आहे.