केवळ दहशतवाद्यांची ठिकाणं….’, एअरस्ट्राइकनंतर भारतीय लष्कराचं मोठं विधान

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 : ऑनलाईन : विशेष प्रतिनिधी: दि. 7 मे – जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने मंगळवारी मध्यरात्री प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राइक केला. भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून केलेल्या या कारवाईनंतर संरक्षण मंत्रालयाने एक प्रेस रिलीज करत याबाबत माहिती दिली. यात संरक्षण मंत्रालयाने सांगितलं, की ‘ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश फक्त दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करणं होता. भारताने केलेला हल्ला शेजारी देशाशी लढण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला नाही.

ऑपरेशन सिंदूर’बाबत संरक्षण मंत्रालयाची माहिती –
संरक्षण मंत्रालयाने ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देत सांगितलं, की ‘काही काळापूर्वीच, भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं, यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आलं, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि ते अंमलात आणले जात होते. एकूण ९ ठिकाणांवर निशाणा साधण्यात आला. यात आमची कृती चिथावणीखोर नाही. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी आस्थापनेला लक्ष्य केलेलं नाही. या हल्ल्यात कोणतीही पाकिस्तानी लष्करी मालमत्ता लक्ष्य करण्यात आली नाही. भारताने आपले लक्ष्य निवडण्यात संयम बाळगला आहे.’

पहलगाम हल्ल्यानंतर भारताचं प्रत्युत्तर
संरक्षण मंत्रालयाने प्रेस रिलीजमध्ये पुढे म्हटलं आहे की, ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ही पावलं उचलण्यात आली आहेत. पहलगाम हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता. ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल सविस्तर माहिती नंतर दिली जाईल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *