महाराष्ट्र 24 : ऑनलाईन : विशेष प्रतिनिधी: दिनांक 7 मे : काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसतोय. होळीनंतर राज्यातील वातावरण पूर्ण बदलून गेले. हेच नाही तर होळीनंतर उष्णता वाढण्याचे संकेत असताना अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यात अवकाळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले होते. अवकाळीचे ढग मागील काही दिवसांपासून राज्यावर आहेत. अनेक ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसवर गेल्याचे चित्र देखील दुसरीकडे आहे. अवकाळी पावसाचा अनेक भागांमध्ये मोठा फटका बसलाय. मराठवाड्यात काल गारपिट झालीये. आताही पावसासोबतच गारपिटीचा इशारा देण्यात आलाय.
काल राज्यात अवकाळीचा फटा बसला. अनेक भागांमध्ये दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. आजही काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस बघायला मिळतोय. काही भागांमध्ये पाऊस तर काही ठिकाणी कडाक्याचे ऊन असल्याची परिस्थिती राज्यात आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यासोबतच गारपिटीचाही मोठा फटका बसलाय.