Pune News : एकीकडे मॉक ड्रील, तर दुसरीकडे ऑपरेशन ‘बांगलादेशी’; ATSची जबरा स्ट्राईक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 7 मे ।। भारतीय हवाई दलानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलाने आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री १.०५ वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन १:३० वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झालं. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. याचदरम्यान, पुण्यात ATSने मोठी कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन बांगलादेशींना एटीएसने पकडलं आहे.

पुणे ग्रामीणमधील ओतूर हद्दीत वास्तव्यास असलेले बांगलादेशी ताजमीर मोश्ताफा अन्सारी (वय २९) याला ओतूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे विचारपूस करून त्याचा बांगलादेशी मित्र मोहम्मद अलिमूल गुलाम अन्सारी (वय २८, दोघेही रा. ओतूर बांगलादेश, मुळ रा. बोकराई जि. शारखीरा, बांगलादेश) यांना ओतूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं आहे. त्यांच्याकडून भारतीय बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मोबाईल हँडसेट, आणि दोघांचे बांगलादेशी पासपोर्ट विसा संपलेले जप्त केले आहेत. सदर कारवाई आमच्या मार्गदर्शनानुसार API दत्तात्रय दराडे, शरद जाधव आणि तांदळवाडे यांनी ओतूर पोलीस स्टेशनमार्फत केली आहे.

ऑपरेशन ‘सिंदूर’मध्ये कोणकोणते दहशतवादी मारले गेले?

१. लष्कर ए तय्यबाचा महत्वाचा कमांडर खालिद मोहम्मद आलम

२. धर्मांध इस्लामिक धर्मप्रसारक आणि कोटली दहशतवादी शिबिराचा मुख्य कमांडर कारी मोहम्मद इकबाल

३. हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगर गंभीररित्या जखमी

४. मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरच्या पत्नीचा मृत्यू.

५. भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा मृत्यू.

६. याशिवाय मौलाना मसूद अजहर याच्या परिवारातील एकूण १४ लोकांचा मृत्यू.

७. लष्कर ए तय्यबाचे दहशतवादी वकास आणि हसन यांनाही कंठस्नान

८. लष्कर ए तय्यबाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल मलिक आणि मुदस्सिर यांचा खात्मा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *