10th SSC Result: ऑल द बेस्ट! दहावीचा निकाल आज, कुठे अन् कसा पाहाल रिझल्ट?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ मे ।। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल लागल्यापासून दहावीचे विद्यार्थी देखील निकालाची प्रतीक्षा करत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. आज निकाल जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये धाकधूक वाढली आहे. आज दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाईल. ऑनलाईन अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहायला मिळणार आहे.

यंदा राज्यातून १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. आज या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहायला मिळणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी ११ वाजता शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. या परिक्षेला राज्यातील १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८.६ लाख मुलं, ७.४७ लाख मुली आणि १९ ट्रान्सजेंडर यांचा समावेश होता. दहावीच्या विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवरून निकाल पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांना आणखी काही वेबसाईटवर हा निकाल पाहयला मिळणार आहे.

या इतर वेबसाईटवर पाहू शकता निकाल –

– digilocker.gov.in

– mahahsscboard.in

– mahresult.nic.in

– msbshse.co.in

– mh-ssc.ac.in

– sscboardpune.in

कसा पाहाल निकाल –

– mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटवर जा.

– होम पेजवर ‘महाराष्ट्र दहावी किंवा दहावीचा निकाल 2025’ लिंकवर क्लिक करा.

– त्यानंतर लॉगिन तपशील व्यवस्थित भरा.

– दहावीचा निकाल गुणांसह तुम्हाला पाहायला मिळेल.

– निकाल डाऊनलोड करून ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *