महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ मे ।। ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानमध्ये विध्वंस घडवला. आता ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं आपलं लक्ष पाक व्याप्त काश्मीरकडे वळवलंय. मात्र त्यासाठी राबवण्यात येणारं ‘ऑपरेशन पीओके’ नेमकं कसं असणार आहे? पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं आता कुरापतखोर पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. त्यामुळे पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि असीम मुनीरची झोप उडालीय. कारण भारतानं थेट पीओके जिंकण्याची रणनिती आखलीय. त्याचे संकेतच पंतप्रधान मोदींनी दिलेत.
भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून थेट पाकिस्तानला हादरवून सोडलंय. त्यामुळेच पाकनं अमेरिकेच्या मदतीनं शस्त्रसंधी घडवून आणली. मात्र भारतानं आता आणखी एक पाऊल पुढं टाकत पाकला पीओके खाली करण्यासाठी इशारा दिलाय. पाकिस्तानने पीओकेतून सेना माघारी घेण्यासाठी अल्टिमेटम दिलाय.
खरंतर पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा अत्यंत गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे पीओके जिंकण्यासाठी युद्ध हाच एकमेव पर्याय आहे. त्यापार्श्वभुमीवर भारतानं पीओके जिंकण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केलीय. तर पीओकेवर भारतीय संविधानात काय म्हटलंय? पाहूयात.
जम्मू आणि काश्मीर भारतीय संघराज्याचा अभिन्न भाग
जम्मू आणि काश्मीरमध्ये संपूर्ण पीओकेचाही समावेश
एकमताने काश्मीर भारताचा भाग असल्याचा ठराव संमत
POK जिंकल्यास पीओकेतील नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळणार
भारतीय संविधानात पीओकेबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असतानाही पाकने 1948 मध्ये पीओकेवर अवैध ताबा घेतलाय. मात्र आता पीओकेत तिरंगा फडकण्याची चिन्हं आहे. त्याची कारणं काय आहेत? पाहूयात.
काश्मीरच्या तुलनेत पीओकेमध्ये विकास नगण्य
POK मधील नागरिकांना सातत्यानं अन्यायपूर्ण वागणूक
उपासमारी आणि गरीबीमुळे पाक सरकारविरोधात नाराजी
दहशतवादी लाँच पॅडमुळे स्थानिकांमध्ये असंतोष
शाहबाज शरीफ आणि मुनीरच्या राजकारणामुळे लोकांमध्ये नाराजी
POK मध्ये पाकविरोधात बंडाची रणनीती
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पीओकेमधील मुझफ्फराबाद आणि कोटली येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आता शस्त्रसंधीनंतर तीन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांनी राष्ट्रपतींची भेट घेतलीय. तर पंतप्रधान मोदीही सातत्याने सैन्यदलासोबत बैठका घेत आहेत. त्यामुळे भारताचं पुढचं लक्ष्य पीओके असणार आहे आणि ते साध्य होणार हे निश्चित.