Sanjay Raut : राजकारणात खळबळ माजवणारा दावा : ….. म्हणून मोदी-शाहांची अटक टळली, वाचा सविस्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ मे ।। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी आणि शाह यांना मदत केली. संजय राऊत यांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकातून खळबळजनक दावा केला आहे. गुजरात दंगलीत तक्लानी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे आरोपी होते. अमित शाह एका खून प्रकऱणात आरोपी होते. यांना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मदत केली. यूपीआयच्या काळात शरद पवार यांच्यामुळे मोदींची अटक टळली होती, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी आपल्य पुस्तकात केला आहे.

संजय राऊत यांच्या दाव्यामुळे राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. सत्ताधाऱ्यांकडून याबाबत अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही, पण राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. मोदींच्या विनंतीनंतर अमित शाह यांना जामीन मिळण्यास संबधित व्यक्तीसोबत बाळासाहेब ठाकरे थेट बोलले होते, असा दावा राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. याच मोदी आणि शाह यांनी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचे स्मरण पुढे किती ठेवलं? असा सवालही उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, असा दावा राऊतांनी पुस्तकात केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना यूपीएचे सरकार होतं. गोध्रा हत्याकांडदरम्यान सीबीआयसह अनेक चौकशांचा समेमिरा सुरू होता. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता. या संघर्षावेळी गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री शाह यांना तुरूंगात टाकले होते. या प्रकरणात कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदी यांच्यावर होता, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. पण लोकशाहीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्‍यांना अटक करणं योग्य नसल्याचे मत शरद पवार यांचे होते. शरद पवार यांनी त्यावेळी कॅबिनेटमध्ये मुद्दा मांडला, त्याला सर्वांनी मूकसंमती दिली होती. त्यामुळेच मोदी यांची अटक टळली होती. मोदींनी या उपकाराचे स्मरण पुढे किती ठेवले? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

अमित शाह हे एका खून प्रकरणात आरोपी हते. त्यांना तडीपारही केले होते. अमित शाह यांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता. त्या पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते. शरद पवार यांनी त्यांच्या स्वभानुसार मदत केली. शाह यांना एका प्रकरणात जामीन मिळाला.हेच अमित शाह पुढे शरद पवार आणि महाराष्ट्रासोबत कसे वागले? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

आज गोदी मिडिया झालेला प्रत्येकजण त्यावेळी मोदींच्या विरोधात होता. पण ठाकरे आणि शिवसेना त्यावेळी मोदींच्या बाजूने ठामपणे उभे होते. पण त्याच मोदी, अमित शाह यांनी शिवसेना सुरी पद्धतीने फोडली, असे राऊत म्हणाले.

गुजरातमधून अमित शाह तडीपार होते. सीबीआयने फास आवळत आणल्यामुळे शाह यांच्यावर तात्पुरत्या जामीनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. बाळासाहेब ठाकरे तुम्हाला मदत करू शकतात, असे कुणीतरी त्यांना सुचवले. एकेदिवशी भर दुपारी लहान जय शाहाला घेऊन मुंबई विमानतळावर उतरले. विमानतळावरून काळी-पिवळी टॅक्सी घेऊन ते वांद्र्याच्या दिशेला निघाले होते. मातोश्रीच्या गेटवर अमित शाह यांना चालकाने सोडलं, तिथे त्यांना आडवलं होतं. गुजरातचा आमदार आणि माजी मंत्री आहे, बाळासाहेबांना तात्काळ भेटायचं आहे, असे त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरेंनी अमित शाहयांचे म्हणणे ऐकलं. त्यानंतर मनोहर जोशी यांच्या फोनवर एका महत्त्वाच्या व्यक्तीला फोन केला, त्यामुळे अमित शाह यांना जामीन मिळाला. पण अमित शाह पुढे कसे वागले ते सर्वांनी पाहिले. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबासोबतसते निर्घृणपणे वागले, असे राऊतांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *