महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ मे ।। भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला असतानाच आता पुन्हा एकदा चीनी ड्रॅगनने भारताची कुरापत काढलीय… चीनच्या दा यांग यी हावो या हेरगिरी जहाजानं मलाक्काची सामुद्रधुनी पार करत थेट भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानं एकच खळबळ उडालीय… दा यांग यी हावो जहाजाच्या पलटणमध्ये 4 जहाजं असल्याचं समोर आलंय….त्यातील 3 जहाजं अरबी समुद्रात तर 1 जहाज बंगालच्या उपसागरात आढळून आलंय…मात्र या जहाजांचा भारताला कसा धोका आहे? पाहूयात….
भारताच्या हद्दीत हेरगिरी जहाज ?
– भारतीय हद्दीत ‘दा यांग यी हाओ’ हे चीनचं हेरगिरी जहाज
– क्षेपणास्त्र चाचण्या आणि नौदलाच्या जहाजांच्या हेरगिरीची शक्यता
– समुद्राच्या तळांचे नकाशे आणि पानबुड्यांचे आवाज रेकॉर्ड करु शकतं
– युद्ध भडकल्यास पानबुड्यांवर हल्ल्यासाठी माहितीचा वापर होण्याची शक्यता
– चीनकडून मात्र हे संशोधन जहाज असल्याचा दावा
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जग पाकिस्तानवर थू थू करत असताना चीनने पाकिस्तानला पाठींबा दिला…..एवढंच नाही तर लष्करी मदतही केली…आत तर चीनचं जहाज भारताच्या समुद्र हद्दीत आढळून आलंय.. त्यामुळे भारतानं चहुबाजूंनी सावध राहण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केलीय…
खरंतर चीनने केलेली कुरापत ही पहिल्यांदाच झाली नाही… तर याआधीही चिनी ड्रॅगनची हेरगिरी करणारी जहाजं भारतीय समुद्रात आढळून आली आहेत….ती नेमकी कधी? पाहूयात…
– जुलै 2019
चीनचं ‘शी यान 1’ जहाजाची भारतीय हद्दीत घुसखोरी, भारताचा तीव्र आक्षेप
– ऑगस्ट 2022
चीनचं ‘युवान वांग 5’ जहाज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर, भारताचा संताप
– नोव्हेंबर 2022
क्षेपणास्त्र चाचणीआधी ‘युवान वांग 6’ या जहाजाच्या हिंदी महासागरात हालचाली
– मार्च 2024
क्षेपणास्त्र चाचणीपुर्वी ‘युवान वांग 3’ च्या भारतीय हद्दीत हालचाली
आता चीनने ‘दा यांग यी हावो’ हे हेरगिरी जहाज नसून संशोधन जहाज असल्याचा दावा केलाय.. तर हा दावा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा…. त्यामुळं भारतानं फक्त पाकिस्तान आणि चीनी सीमेवरच नाही तर सागरी सीमांवरही डोळ्यात तेल घालून जागरुक राहण्याची गरज आहे.. कारण चिन्यांची पाठीत खंजीर खुपसण्याची जुनीच सवय आहे…