महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मे ।। कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीत कात्रज- कोंढवा रस्त्यावरील वारंवार येणार्या नागरिकांच्या तक्रारीमुळे व त्यांना होणार्या त्रासामुळे तसेच वाहतूक कोंडीमुळे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी वाढत्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
उपायुक्त परिमंडळ क्रमांक 4 अंतर्गत कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील राजस सोसायटी चौक ते खडीमशीन चौकातील रस्ता पदपथावरील तसेच फ्रंट व साईट मार्जिनमधील अतिक्रमणांवर बांधकाम विकास विभाग व अतिक्रमण विभाग संयुक्तरीत्या कारवाई करण्यात आली. (Latest Pune News)
अतिक्रमण उपायुक्त संदीप खलाटे, परिमंडळ क्र. 04 चे उपायुक्त जयंत भोसेकर, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या नियंत्रणाखाली कारवाई करण्यात आली. सदर कारवाईला उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, 10 सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, 03 मनपा पोलिस स्टाफ व 10 महाराष्ट्र सुरक्षा बल इ. स्टाफ उपस्थित होते.
सदर कारवाईमध्ये एकूण 7500 चौ. फूट व 16 कच्चे व पक्के शेड मोकळे केले. तसेच, 07 ट्रक साहित्य व माल जप्त करण्यात आला, अशी माहिती क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक मेघा राऊत यांनी दिली.
एकूण कारवाई अहवाल
स्टॉल – 01
टप हातगाडी – 05
स्टील काऊंटर – 05
लोखंडी काऊंटर – 03
स्टील टेबल – 02
ऊस गुराळ – 01
लोखंडी टेबल – 01
सोफा सेट – 06
लोखंडी कॉट – 06
प्लास्टिक खुर्ची – 11
प्लास्टिक स्टूल -16
फ्रिज – 01
लोखंडी पाळणा – 01
सायकल – 13
सायकल पंप – 01
व्यावसायिक वाहन (चारचाकी) – 1
कात्रज- कोंढवा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. हातगाडी, पथारी व्यावसायिक, फ्रंट मार्जिन अतिक्रमणे करू नयेत. यापुढे नियमित कारवाई होणार आहे.
– मेघा राऊत, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक.