महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
उगाचच चिडचिड कराल. कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. नवीन लोकांशी संपर्क होईल. नोकरीच्या ठिकाणी कामे सुरळीत पार पडतील.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. अति श्रमाचा ताण जाणवेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. कामात चलबिचलता येईल. गप्पांच्या ओघात शब्द देताना काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामात एकसूत्रता ठेवावी.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
जवळचा प्रवास चांगला होईल. भावंडांचा सहवास लाभेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल. नवीन विषय आवडीने जाणून घ्याल. आवडता छंद जोपासाल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. कौटुंबिक सौख्यात वेळ घालवाल. तरुण वर्गाशी जवळीक वाढेल. नवीन मित्र जोडाल. काही बाबीत तडजोड करावी लागेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. कमिशन मधून मिळणार्या फायद्याचा लाभ उठवा. धार्मिक कामातून मान वाढेल. वरिष्ठांना नाराज करू नका. पोटाची काळजी घ्यावी.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. मुलांवर बारीक लक्ष ठेवावे. राग अनावर होऊ देऊ नका. पत्नीचे मत मान्य करावे लागेल. अचानक धनलाभ संभवतो..
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
कौटुंबिक शांतता जपावी लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. तडजोडीतून काही प्रश्न मार्गी लावावेत. जुनी कामे पूर्ण करता येतील. फार विचार करत बसू नका.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
कामातील उत्साह वाढवावा लागेल. मनातील शंका बाजूला साराव्यात. कौटुंबिक प्रश्न संयमाने हाताळा. प्रवासात सावधानता बाळगा. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
भक्तीमय वातावरणाचा अनुभव घ्याल. बोलताना सारासार विचार करावा. जुन्या गोष्टीत फार अडकून राहू नका. अकारण होणार्या खर्चाकडे लक्ष ठेवा. कामात सहकार्यांची साथ मिळेल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
उगाच त्रागा करू नका. मनाची चंचलता कमी करण्याचा प्रयत्न करावा. कचेरीची कामे अडकून राहतील. दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. घरात अधिकार वाणीने वागाल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
खर्चाचे प्रमाण वाढेल. बाहेरील गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका. सामाजिक जाणीव जागृत ठेवावी. जवळचे नातेवाईक भेटतील. अधिकाराचा स्वबळावर वापर करावा.