महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ मे ।। मे महिना संपायला अवघे ७ दिवस उरले आहेत. तरीही अद्याप लाडक्या बहिणींना मे महिन्याचे १५०० रुपये आले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत या महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. परंतु या योजनेत मे महिना संपत आला तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. मात्र, आता येत्या आठवड्याभरात पैसे जमा केले जाऊ शकतात. येत्या आठवड्याभरात महिलांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.
८ दिवसांत पैसे आले नाही तर (Ladki Bahin Yojana May Month Installment)
लाडक्या बहिणींना ८ दिवसात खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजे. परंतु जर असे झाले नाही तर कदाचित पुढच्या महिन्यात हप्त्यात जमा होऊ शकतो. पुढच्या महिन्यात जून आणि मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जर अधिकृत घोषणा झाली तरच महिलांना पुढच्या महिन्यात पैसे येऊ शकतात.
लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी
लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु झाली आहे. अनेक बोगस अर्ज आल्यानंतर पुन्हा पडताळणी करणे ठरवले आहे. यामध्ये ज्या महिला निकषाबाहेर आहेत किंवा खोटी माहिती देऊन ज्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. त्यामुळे या महिन्यात काही महिलांचे अर्ज बाद केले जातील.
