महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मे ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
व्यावहारिक कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कचेरीची कामे मनाजोगी पार पडतील. कागदपत्रे नीट तपासून घ्या. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
जोडीदाराकडून लाभ होतील. आवडीच्या गोष्टींना वेळ मिळेल. मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता. गोडीने कामे साधून घेण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक कामात हातभार लावाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
दुसर्यावर अवलंबून राहू नका. कामात त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक कामे सावधानतेने करावीत. गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. क्षणिक आनंदाने खुश व्हाल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
खेळीमेळीत दिवस जाईल. घरात सर्व गोष्टीत टापटीपपणा ठेवाल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. सहकार्यांना कामात मदत कराल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
जवळच्या प्रवासाचा योग येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. भावंडांना भेटण्याचा योग येईल. वडीलधार्यांचा आशीर्वाद मिळेल. जोडीदाराचा स्वभाव आग्रही राहील.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. कामात घाई गोंधळ उडू शकतो. योग्य नियोजनावर भर द्यावा. काही गोष्टी अचानक घडू शकतात. चटपटीत पदार्थ खाल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. व्यवसायानिमित्त प्रवास घडेल. अचानक धनलाभाच्या घटना घडतील. तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. कामात अधिक कष्ट पडतील.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
मनाच्या चंचलतेला आवर घालावी. जोडीदाराच्या शब्दाला प्रमाण मानावे लागेल. भावंडांना मदत करावी लागेल. भागिदारीतून लाभ होईल. पतीच्या कमाईत वाढ होईल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. तुमच्यातील साहस वाढेल. नवीन अधिकार सावधानतेने वापरा. इतरांवर अधिक विसंबून राहू नका. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
कामाला चांगली गती येईल. गोड शब्दातून संवाद साधावा. कामातून चांगले समाधान मिळेल. हातातील कामात यश येईल. दिवस चांगल्या कमाईचा असेल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
आर्थिक व्यवहार सतर्कतेने करावेत. घरात तुमचा रूबाब राहील. इतरांना परोपकाराचे महत्त्व पटवून द्याल. जोडीदाराच्या सल्ल्याने वागावे लागेल. बौद्धिक छंद जोपासता येतील.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscopei)
जास्त अधीर होऊ नका. लष्कराच्या भाकर्या भाजायला जाऊ नका. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. घरातील वातावरण खेळकर राहील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.