महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मे ।। मे महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मे आणि जून महिन्याचे ३००० रुपये महिलांच्या खात्यात एकत्र येतील, असं बोललं जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अधिकृत माहिती आल्यावरच तुम्ही विश्वास ठेवा. पुढच्या महिन्यात वटपोर्णिमेचा मूहूर्त साधून महिलांना पैसे दिले जाऊ शकतात.
मे महिन्याचा हप्ता कदाचित लांबणीवर जाऊ शकतो. जून महिन्यात महिलांच्या खात्यात एकत्रितपणे ३००० रुपये येण्याची शक्यता आहे. याआधी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले आहेत. मात्र, या महिन्यात अजूनही पैसे आलेले नाहीत त्यामुळे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
मे आणि जूनचा हप्ता एकत्रित येणार की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती आलेली नाही. परंतु अजूनपर्यंत मेच्या हप्त्याबाबत घोषणा झालेली नाही. त्यावरुन हा हप्ता पुढे जाण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात एकत्रितपणे कि वेगवेगळ्या दिवशी मे आणि जूनचा हप्ता येणार याबाबतही माहिती समोर आलेली नाही. पुढच्या महिन्यात वटपोर्णिमेचा मूहूर्त साधून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.
प्रत्येक महिन्यात महिला व बालविकास मंत्री हप्त्याच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा करतात. परंतु या महिन्यात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता वाटू लागली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यावर अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं. मी ३.३७ कोटी रुपयांच्या फाइलवर सही केली आहे. त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळण्याची आशा आहे.