महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ मे ।। पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. पुणे जिल्ह्यातल्या बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावाला पूराच्या पाण्याने वेढा घातला आहे, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे, शेतात पाणी साचले, घरांना- इमारतींना तडे गेले आहेत. पुणे जिल्ह्यातला पाऊस लक्षात घेता एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. पूरात अडकलेल्या गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नेमका कुठे जाता याची माहिती समोर आली आहे. हवामान खात्याने आकडेवारी जारी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद पनदरेमध्ये झाली आहे. पनदरे मध्ये १०४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ दौंड तालुक्यात ९८ मिलिमीटर इतका पाऊस झाला. दौंड नंतर लोणावळ्यात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अजूनही या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभागाला बारामती आणि इंदापूरमधील पावसाचा अहवाल सादर केला. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील झालेल्या पावसाची आकडेवारी अहवालातून सादर करण्यात आली. बारामती आणि इंदापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यात ८३.६ मिमी पाऊस तर इंदापूर मध्ये ३५.७ मिमी पाऊस झाला.
पुणे जिल्ह्यात कुठे किती पावसाची नोंद –
पनदरे: १०४ मिमी
दौंड: ९८ मिमी
लोणावळा: ७६ मिमी
बारामती: ४९.५ मिमी
ढमढेरे: ३५.५ मिमी
वडगाव शेरी: ३४ मिमी
निमगिरी: २८ मिमी
माळीण: २७ मिमी
हडपसर: २५ मिमी
बारामतीमधील मंडल निहाय पावसाची आकडेवारी –
बारामती: ७७ मिमी
माळेगाव: ८२.८ मिमी
पनदरे: १०४.८ मिमी
वडगाव: ९६.३ मिमी
लोणी: ८६ मिमी
सुपा: ७६ मिमी
मोरगाव: ७५.५
उडवडी: ८५.३
शिर्सुफळ: ७४.३
इंदापूरमधील मंडल निहाय पावसाची आकडेवारी –
भिगवण: ६३.३ मिमी
इंदापूर: २३.५ मिमी
लोणी भापकर: ४८.३ मिमी
बावडा: २३ मिमी
काटी: २६.५ मिमी
निमगाव केतकी: १८ मिमी
अंथुरने: ४४ मिमी
पळसदेव: ४८.३ मिमी
लाखेवाडी: २६.५ मिमी