महाराष्ट्र 24:पिंपरी :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक चौक मोरवाडी येथील दर रविवारची अखंडित साप्ताहिक पुजा (वर्ष १० वे ) सौ. रसिका दातीर- पिसे (महसूल सहाय्यक) यांच्या हस्ते संपन्न झाली सौ. रसिका दातीर – पिसे नुकत्याच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची महसूल सहाय्यक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या त्यांचा साप्ताहिक पूजेच्या वतीने पुष्पगुच्छ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे पुस्तक भेट देऊन सौ. रेणुकाताई भोजने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या राज्याची सेवा करताना समाजाची सेवा माझ्या हातुन ज्यास्तीत ज्यास्त कशी घडेल यासाठी माझा प्रयत्न राहील श्री दिपक भोजने यांनी अखंडित साप्ताहिक पुजे संबंधित माहिती दिली आजची पुजा ही १० व्या वर्षातील शेवटची पुजा असुन येत्या रविवारी १ जूनला ११ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत १० वा वर्धापन दिन , ३०० वी जयंती वर्ष , आजची १० व्या वर्षातील शेवटची पुजा महिलेच्या हस्ते हा एक दुग्धशर्करा योग आहे पुजा वर्धापनदिन उत्साहात साजरा करायाचा आहे यावेळी सुधाकर अर्जुन , दिपक भोजने , धनंजय गाडे , सुमेध कावळे , अरविंद कलापुरे , के जी कुमार , रेणुका भोजने , रसिका दातीर- पिसे उपस्थितीत होते*