महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० मे ।। जून महिना सुरु होणार आहे. जून महिन्यात जर तुमचे बँकेत काही काम असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. जून महिन्यात अनेक दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे तुमचे बँकेच्या ब्रँचमध्ये काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी नक्की वाचून जा. रिझर्व्ह बँक दर महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. जून महिन्यात एकूण १२ दिवस बँका बंद असणार आहेत.यामध्ये वीकेंड आणि सणावाराच्या सुट्ट्या असणार आहेत.
रिझर्व्ह बँकेने जारी केली सुट्ट्यांची यादी
रिझर्व्ह बँक दर महिन्याला सुट्ट्यांची यादी जाहीर करते. वेगवेगळ्या राज्यात सणानुसार सुट्ट्या असणार आहेत. याबाबत अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे. बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असणार आहेत.
जूनमधील सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in June 2025)
१ जून (रविवार)- सर्व राज्यांमध्ये बँका बंद
६ जून (शुक्रवार)- ईद-उल-अजहा (केरळमध्ये बँका बंद)
७ जून- शनिवर- बकरी ईद (देशात सर्व बँका बंद)
८ जून- रविवार
११ जून (बुधवार)- संत कबीर जयंती (हिमाचल आणि सिक्किममध्ये बँका बंद)
१४ जून (शनिवार)- दुसरा शनिवार (देशातील सर्व बँका बंद)
१५ जून (रविवार)- देशातील सर्व बँका बंद
२२ जून (रविवार)- सर्व बँकांना सुट्टी
२७ जून (शुक्रवार)- रथ यात्रा/कांग (ओडिशा आणि मणिपूरमध्ये बँका बंद)
२८ जून (शनिवार)- चौथा शनिवार (सर्व राज्यांमध्ये बँका बंद)
२९ जून (रविवार)- बँका बंद
३० जून (सोमवार)- रेमना नी (मिझोराममध्ये बँकांना सुट्टी)
जरी जून महिन्यात बँका १२ दिवस बंद असल्या तरी ऑनलाइन सर्व्हिस सुरु राहणार आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने व्यव्हार करु शकतात. तुम्हाला सुट्ट्यांमध्ये चेक क्लिअरिंग किंवा बँखेतील कामे करता येणार नाहीत. परंतु डिजिटल कामे सुरु राहणार आहेत.