महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० मे ।। वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagwane Case) प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे भावांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे. शशांक हगवणे (Shashank Hagwane) आणि सुशील हगवणे (Sushil Hagwane) यांच्याकडील पिस्तूल परवाण्याची चौकशी पुणे पोलिसांकडून (Pune Police) सुरू असून पिस्तूल परवाण्याची चौकशीअंती धक्कादायक माहिती समोर आली आहे. हगवणे बंधुंनी चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक हगवणे याच्या विरोधात वारजे, तर सुशील हगवणे याच्या विरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परवाना घेत असताना हगवणेंनी पुण्यातील रहिवाशी म्हणून पत्ते दिल्याचे समोर आलं आहे. पुणे पोलीस (Pune Police) आयुक्तालयातून पिस्तुल परवाना कसा घेतला? शिवाय एकाच दिवशी परवाने आले होते, त्यामुळे या प्रकरणात चौकशीचे निर्देश देण्यात आल्यानंतर तपासात ही बाब उघाड झाली असून खोटी माहिती देऊन शस्त्रपरवाने मिळवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामी हगवणे बंधुंचा या निमित्याने आणखीन एक कारणामा उघाड झाला आहे. (Vaishnavi Hagwane Case)
हगवणे बंधूंचे पाय आणखी खोलात
मिळालेल्या माहितीनुसार, शशांक हगवणे ने 17 ऑक्टोबर 2022 मध्ये पुणे पोलिस आयुक्तालयात स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना मिळण्याबाबत अर्ज केला होता. हा अर्ज करताना शशांकने त्याचा रहिवासी पत्ता पुण्यागील कर्वेनगर येथील असल्याचे दाखला दिला. शशांक याचा मूळ पत्ता मुळशी तालुक्यातील भूकुम या ठिकाणचा असताना सुद्धा आपण पुणे शहरातील कर्वेनगर मध्ये गेल्या 10 वर्षांपासून राहत असल्याची माहिती दिली. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरूड आणि वारजे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
शशांक याच्यावर भारतीय न्याय संहिता चे कलम 177, 191, 192, 193, 417, 420 सह शस्त्र अधिनियम 1951 चे कलम 30 व शस्त्र नियम 2016 चे कलम 11(8 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशांक याचा भाऊ सुशील याच्यावर सुद्धा शस्त्र मिळवण्यासाठी कोथरूड येथे राहत असल्याची माहिती पुणे पोलिसांना दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे पोलीसांकडून शस्त्र परवाना मीळवून पिस्तुल खरेदी केली. त्यानंतर एका व्हिडीओमध्ये सुशील पिस्तुल कंबरेला लाऊन नाचताना दिसतो आहे तर शशांकने पिस्तुलाचा वापर करुन प्रशांत एळवंडे या व्यवसायीकाला फसवण्याचा गुन्हा कालच त्याच्यावर दाखल झालाय. या प्रकरणात फरार असलेल्या निलेश चव्हाणणे देखील याच कालावधीत शस्त्र परवाना मीळवला होता.
