महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जून ।। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याच्या घरातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी तीन मोबाईल फोन आणि एक बंदूक असा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मोबाईलमध्ये करिष्मा आणि लता हगवणे यांचा मोबाईलचा देखील समावेश आहे. ज्या बंदुकीच्या जोरावर निलेश चव्हाण यांनी वैष्णवीच्या नातेवाईकांना हुसकावून लावलं होत. ती बंदूक देखील पोलिसांनी जप्त केली आहे. निलेश चव्हाण याला अटक केल्यानंतर शनिवारी बावधन पोलिसांनी त्याच्या पुण्यातील कर्वेनगर येथील घराची झळती घेतली होती, त्यावेळी पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.
निलेश चव्हाण याला पोलिसांनी नेपाळमधून बेड्या ठोकल्या. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात राज्यातून संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणचा कसून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत हगवणे कुटुंबातील सदस्यासह निलेश चव्हाण या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. निलेश चव्हाण याने हगवणे यांना मदत केल्याचे तपासातून दिसून आलेय. निलेश चव्हाण याच्या गरातून पोलिसांना तीन मोबाईल आणि बंदूक मिळाली आहे. त्यामुळे आता हगवणेचे पाय खोलात गेले आहेत.