पुण्यात सेतू कार्यालय 3 जूनपर्यंत बंद ; नागिकांना मनस्ताप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जून ।। विविध कारणांसाठी नागरिकांना लागणारे दाखले एकाच ठिकाणी प्राप्त व्हावेत, या उद्देशाने निगडीतील तहसील कार्यालयात सेतू केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, तांत्रिक कारणामुळे तसेच पोर्टल अद्ययावतीकरणासाठी केंद्र 26 मे पासून बंद आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना दाखले काढण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच नागरिकांचे दाखल्यांचे काम रखडले आहे. दरम्यान, केंद्र चालविण्याचा संपलेला ठेका, वारंवार बदलणारे केंद्रचालक आणि नागरिकांच्या तक्ररींपुढे तहसीलदारदेखील हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

सरकारी योजना, आवास योजना, वैद्यकीय सवलती आणि शिक्षणासाठी दाखले आवश्यक असतात. दाखले मिळविण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू असते. गैरसो दूर करण्यासाठी शासनाकडून सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जेणेकरून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध दाखले उपलब्ध होऊ शकतील. निगडीतील सेतू केंद्रावर नागरिकांची दररोज गर्दी असते. मात्र, या केंद्राबाबत सातत्याने सर्व्हर डाऊनची समस्या, वेळेत दाखले न मिळणे, ठाराविक कागदांसाठी संबंधितांकडून अडवणूक होत असल्याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या. दरम्यान, येथील केंद्र यंत्रणा अद्ययावतीकरणासाठी 3 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची सूचना येथे लावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *