महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जून ।। ‘आधार नोंदणी आणि अद्यतन नियम, २०१६’ नुसार, आधार नोंदणीच्या तारखेपासून दर १० वर्षांनी ओळख आणि पत्त्याचा पुरावा अपडेट करणं अनिवार्य आहे. पण अनेकजण अद्याप नोंदणीपासून जुनेच आधार कार्ड वापरताना दिसतात. अशा लोकांना आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी १४ जून २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पण अंतिम मुदतीनंतर आधार कार्डवरील माहिती मोफत अपडेट करण्याची सेवा लोकांना मिळणार नाही, त्यांना माहिती अपडेट करण्यासाठी कार्डधारकांना प्रत्यक्ष आधार केंद्रावर जावं लागेल.