Japanese Baba Vanga : जपानी बाबा वेंगाची पुन्हा खळबळजनक भविष्यवाणी; नेमके काय केले भाकित ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३ जून ।। भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या संदर्भात, सरकारने जनतेला त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आणि अनेक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोना २०१९ च्या अखेरीस आणि २०२० च्या सुरुवातीला पहिल्यांदा पसरला. या साथीमुळे जगात लाखो लोकांचा मृत्यू झाला. पण आता २०२५ मध्ये कोरोनाच्या परतण्याने लोकांच्या मनात पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, सोशल मीडिया आणि इंटरनेटवर पुन्हा एक नाव व्हायरल होत आहे, ते म्हणजे रियो तात्सुकी. लोक त्यांना जपानी बाबा वेंगा म्हणून ओळखतात. १९९९ मध्ये आलेले त्यांचे ‘द फ्युचर अ‍ॅज आय सी इट’ हे पुस्तक जगाचे लक्ष वेधून घेत होते, जेव्हा त्यांनी पुस्तकात नमूद केले होते की २०२० मध्ये एक अज्ञात विषाणू येईल, एप्रिलमध्ये तो शिखरावर पोहोचेल आणि नंतर १० वर्षांच्या आत पुन्हा परत येईल. तो अधिक प्राणघातक आणि विनाशकारी होईल.

जगाने २०२५ च्या मध्यापर्यंत कोविडसोबत जगणे शिकले होते. पण भारतासह अनेक देशांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये अचानक वाढ दिसून आली. जरी ते इतके भयावह नसले तरी आरोग्य मंत्रालय आणि शास्त्रज्ञांमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२४ पर्यंत कोविड-१९ चे एकूण ७०.४ कोटींहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७० लाख लोकांचा मृत्यूही झाला आहे.

बाबा वेंगाचे कोरोनाबद्दलचे भाकित
जपानी बाबा वेंगा यांची कोरोनाच्या परत येण्याचे भाकित हे २०२० च्या भाकिताशी अगदी जुळते. कोविडचा पहिला मोठा स्फोट २०२० मध्ये मार्च-एप्रिल दरम्यान भारतात आणि जगात झाला होता. या काळात कोरोना त्याच्या शिखरावर होता आणि नंतर तो गायब झाला. पण, कोरोनाबद्दल केलेल्या नवीन भाकितामुळे चिंतेची रेषा निर्माण झाली आहे, त्यानुसार २०३० मध्ये कोरोना पुन्हा परत येईल आणि यावेळी विषाणू केवळ अधिक लोकांना प्रभावित करणार नाही तर त्याच्याशी लढण्यासाठीची संसाधने देखील अपूरी पडतील असे भाकित करण्यात आले आहे.

विज्ञान विरुद्ध भविष्यवाणी
सरकार आणि आरोग्य संघटना विषाणूच्या उत्पत्ती, प्रकार आणि लसीकरणावर लक्ष केंद्रित करत आहेत. परंतू मोठ्या संख्येने लोकांनी जपानी बाबा वांगा तात्सुकी यांच्या भविष्यवाणीला गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर ‘#2030CovidPrediction’सारखे ट्रेंड व्हायरल होत आहेत. या भाकिताचे विश्लेषण YouTube, Reddit आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *