Pune News :सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री अन् पीएमपी मालामाल ; तब्बल ‘इतक्या’ लाखांचे अतिरिक्त उत्पन्न

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जून ।। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसच्या तिकीट दरात 1 जून पासून वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ तब्बल 12 वर्षांनी करण्यात आली असून जवळपास दुपटीने ही दरवाढ केल्याने पुणेकरांच्या खिशाला कात्री लागली आहे, तर दुसरीकडे पीएमपीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. दरवाढ केल्यानंतर पहिल्याच दिवशी रविवार असतानाही पीएमपीला 55 लाखांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे.

पीएमपीला रविवारी एकाच दिवसात 55 लाखांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे रविवारी सुटीचा दिवस असल्याने नियोजनापेक्षा 1000 बस रस्त्यांवर धावत नसतानाही उत्पन्न वाढले. रविवारी 1554 बसमधून नऊ लाख 45 हजार 971 प्रवाशांनी प्रवास केला त्यामुळे त्यामुळे पीएमपीला दिवसभरात एक कोटी 97 लाख 17 हजार रुपयांचा महसूल मिळाला. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात पीएमपी कडून तिकीट दरवाढ करण्यात आली आहे.

नवीन दररचनेनुसार, १ ते ५ किमी अंतरासाठी आता दहा रुपये मोजावे लागत आहेत तर पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीसाठीचा 40 आणि 50 रुपयांचा दैनंदिन पास रद्द करुन त्याएवेजी ७० रुपयांचा करण्यात आला आहे तर,पीएमआरडीए हद्दीत १२० ऐवजी १५० रुपयांना, तर मासिक पास ९०० ऐवजी दीड हजार रुपये झाला आहे. यामुळे पुणेकरांच्या खिशाला दुप्पट कात्री लागली आहे.

तिकीट दरवाढ कमी करण्याची मागणी
नव्या तिकीटदर रचनेत पहिल्या स्टेजमध्ये पाच कि.मी. अंतर आहे. त्यासाठी प्रवाशांना १० रुपये तिकीट द्यावे लागेल. मात्र, एखाद्या प्रवाशाला दुसऱ्या स्टेजमधील पहिल्याच थांब्यावर उतरायचे असले तर त्याला थेट २० रुपये तिकीट द्यावे लागत आहे त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. तिकिट दरवाढीत पुढील स्टेज रचना करताना पाच रुपये तिकीट वाढविण्याची रचना करावी. एकदम दुप्पट दर आकारू नये, तसेच ज्या प्रवाशाला दैनंदिन पास काढून फक्त पुणे मनपा किंवा पीसीएमसी यापैकी एकाच हद्दीत प्रवास करायचा आहे त्याला पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील पासाची सक्ती करु नये अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *