महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जून ।। नोकरी शोधत असाल तर ही बातमी वाचा. आधार कार्ड बनवणारी कंपनी म्हणजेच UIDAI मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणामध्ये नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणमध्ये (UIDAI Recruitment) असिस्टंट सेक्शन ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला uidai.gov.in या वेबसाइटवर मिळेल. तुम्ही अधिसूचना वाचून अर्ज करावेत.
UIDAI मधील ही भरती राज्य कार्यालय भोपाळसाठी होणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २६ मे २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अजून तुमच्याकडे दीड महिन्याचा कालावधी आहे.
आधारमधील (Aadhaar Recruitment) ही भरती परराष्ट्र सेवा नियमांनुसार प्रतिनियुक्ती आधारावर केली जाणार आहे. केंद्र सरकारी अधिकारी जे सध्या त्याच पदावर काम करत आहेत. किंवा लेव्हल ३, ४ आणि लेव्हल ५ पदांवर किमान ७, ५ किंवा ३ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. याशिवाय राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, सरकारी उपक्रम, स्वायत्त संस्थेचे अधिकारी जे त्यात पदासाठी काम करत आहे. असे उमेदवारही अर्ज करु शकतात.
सहाय्यक विभाग अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षांपेक्षा कमी असावे. या उमेदवारांना लेव्हल ६ नुसार दर महिन्याला ३५,४०० ते १,१२,४०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज संचालक (एचआर), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, तळमजला, सर्वोच्च न्यायलय मेट्रो स्टेशन, प्रगती मैदान, नवी दिल्ली ११०००१ येथे पाठवायचा आहे.