Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात उसळी ; भाव सामान्यांच्या आवाक्या बाहेर - Maharashtra 24

Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात उसळी ; भाव सामान्यांच्या आवाक्या बाहेर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जून ।। गेल्या काही दिवसापासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. अशातच आज आज, ५ जून २०५ रोजी, गुरुवारी भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे खरेदीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ०५ जून २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,५९० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९०,३७४ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १०१,९४० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,०१९ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव

मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९०,२०९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ९८,४१० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९०,२०९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,४१० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९०,२०९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,४१० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९०,२०९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,४१० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *