Gold Silver Prices: चांदीच्या दरांनी इतिहास रचला तर सोन्याच्या किमतीत वाढ सुरूच : पहा ताजा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जून ।। पुढील काही दिवसात तुम्ही जर सोनं आणि चांदीच्या किमती स्वस्त होणार असल्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सराफा बाजारात सोन्याचा भाव पुन्हा एक लाख रुपयांच्या जवळ वाटचाल करत आहे तर दुसरीकडे दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीच्या दरांनी इतिहास रचला आहे.

चांदीच्या किमतीत एकाच दिवशी 2000 रुपयांनी वाढून 1,04,100 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. याशिवाय सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आणि 430 रुपयांनी प्रति 10 ग्रॅमने वाढला. अशाप्रकारे सलग चौथ्या दिवशी दोन्ही मौल्यवान धातूच्या किमतीत वाढीचा कल पाहायला मिळाला. स्थानिक बाजारात चांदीचा भाव 2000 रुपयांनी वाढून 1,04,100 रुपये प्रति किलोच्या नवीन उच्चांकावर पोहोचला.

सोन्या-चांदीची झळाळी वाढली
ऑल इंडिया सराफा असोसिएशन, IBJA, च्या माहितीनुसार औद्योगिक मागणी, मर्यादित जागतिक पुरवठा आणि महागाईपासून संरक्षण यामुळे ही वाढ नोंदवली गेली. जागतिक बाजारातही सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या असून औद्योगिक मागणी आणि गुंतवणूकदारांचा महागाई टाळण्यासाठीचा कल यामुळे चांदीमध्ये ही वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचवेळी, कमकुवत डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जाच्या चिंतेमुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.

तज्ञ काय म्हणतात
LKP सिक्युरिटीजचे जतिन त्रिवेदी म्हणाले की कमकुवत डॉलर आणि टॅरिफबद्दल अनिश्चितता दिसत असून अमेरिकेतील कर्जाच्या चिंतेमुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढली परिणामी, सोन्याच्या किमतींनी पुन्हा एकदा उभारी घेतली. तसेच त्यांनी असेही सांगितले की जागतिक स्तरावर सोने प्रति औंस $3,395 च्या वर गेले आहे तर, MCX वर सोन्याच्या भाव 98,450 रुपयांच्या वर आहे. MCX एक कमोडिटी एक्सचेंज आहे जिथे सोन्याचा व्यवहार केला जातो.
त्रिवेदी पुढे म्हणाले की, जागतिक तणाव आणि व्यापाराबाबत अनिश्चिततेमुळे सराफा बाजारात सकारात्मक वातावरण आहे. म्हणजे की जगात जे काही घडत आहे त्यामुळे, सोने आणि चांदीचा बाजार तेजीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *