Coranavirus Updates: कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; मुंबईत 37 तर पुण्यात 42 एक्टिव्ह केसेस, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ जून ।। महाराष्ट्रासह देशात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे बघायला मिळत आहे. राज्यात काल (6 जून) 24 तासांमध्ये 98 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पुण्यात 42 आणि मुंबईत 37 एक्टिव्ह केसेस (Coranavirus Updates) असल्याचे समोर आले आहेत. शिवाय या दोन्ही महत्त्वाच्या शहरांप्रमाणेच राज्यातील इतरही जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने ही चिंतेची बाब मनाली जात आहे. सध्या महाराष्ट्रात 577 सक्रिय रुग्ण असून प्रशासनाकडून योग्य ती घेतली जात आहे. तर जानेवारी 2025 पासून मुंबईमधील एकूण रुग्ण रुग्णांची 612 वर पोहचली आहे. जानेवारी 2025 पासून आज पर्यंत सद्व्याधीने ग्रस्त असलेले 17 आणि इतर 1 असे एकूण 18 रुग्ण दगावले असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील कोविडच्या रुग्णांची आकडेवारी
पुणे मनपा – 42
मुंबई – 37
ठाणे मनपा- 1
नवी मुंबई मनपा-4
कल्याण मनपा-3
मीरा भायंदर 7
पनवेल मनपा -7
पुणे-2
पिंपरी चिंचवड मनपा-6
सातारा -1
कोल्हापूर मनपा-1
सांगली मनपा -1
छ. संभाजीनगर-1
परभणी मनपा-1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *