RBIचे गिफ्ट, ! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ जून ।। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या दरात म्हणजेच रेपो दरात ०.५०% कपात केली आहे. आता रेपो रेट ५.५० टक्के झाल्याने बँकांना आरबीआयकडून कमी व्याजदराने कर्ज मिळेल. त्यामुळे कर्ज स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गृहकर्जदारांचा ईएमआय म्हणजे मासिक हप्ताही कमी होईल. हा निर्णय पतधोरण समितीच्या ४ ते ६ जून दरम्यानच्या बैठकीत झाल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी दिली.

व्याजदर ८.५%चे ७.५% झाल्यास

हप्त्याची रक्कम कायम ठेवून कालावधी कमी केल्यास (रक्कम रुपयांत)

कर्ज १ लाख २५ लाख ५० लाख १ कोटी
मूळ मुदत (महिने) २४० महिने २४० महिने २४० महिने २४० महिने
मूळ ईएमआय ८६७.८२ २१,६९५.५८ ४३,३९१.१६ ८६,७८२.३२
मूळ व्याज १,०८,२७७.५८ २७,०६,९३९.४० ५४,१३,८७८.८० १,०८,२७,७५७.६०
ईएमआय कायम ठेवल्यास व्याज ७७,३९९.५५ १९,३४,९८८.८३ ३८,६९,९७७.६५ ७७,३९,९५५.३१
व्याज किती वाचेल ३०,८७८.०२ ७,७१,९५०.५७ १५,४३,९०१.१५ ३०,८७,८०२.२९
मुदत किती घटेल ३६ महिने ३६ महिने ३६ महिने ३६ महिने

यंदा एकूण १ टक्का कपात
आरबीआयने फेब्रुवारीत झालेल्या बैठकीत व्याजदर ६.५% वरून ६.२५% इतका केला होता. ही कपात ५ वर्षांनंतर झाली होती. एप्रिलच्या बैठकीतही दरात ०.२५% कपात करण्यात आली. शुक्रवारी तिसऱ्यांदा कपात झाली. यंदा तीन वेळा मिळून १ टक्के इतकी व्याजदरात कपात झाली.

जाणून घ्या तुमच्या एफडीचे व्याज कितीने होईल कमी?

गुंतवणूक पूर्वीचे नवीन फरक
रक्कम व्याज व्याज
(रुपयांत) (६.५%) (६%)
१,००,००० ६,५०० ६,००० ५००
२,००,००० १३,००० १२,००० १,०००
५,००,००० ३२,५००, ३०,००० २,५००
७,००,००० ४५,५०० ४२,००० ३,५००
१०,००,००० ६५,००० ६०,००० ५,०००

(कालावधी : १ वर्ष; साधे वार्षिक व्याज गृहित धरून. कालावधी दोन वर्षे किंवा अधिक आणि चक्रवाढ व्याज असेल, तर फरक अजून मोठा)

सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात ०.५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत पाच सदस्यांनी कपातीच्या बाजूने मतदान केले.
-संजय मल्होत्रा, गव्हर्नर, आरबीआय

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *