महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ जून ।। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज एका लेखात, गेल्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने याला उत्तर देत राहुल गांधी यांचे आरोप हस्स्यास्पद असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
आता राहुल गांधी यांनी यावर निवडणूक आयोगाला प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, निवडणूक आयोगाचा गंभीर प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा योग्य मार्ग नाही. हे एक टाळाटाळ करणारे विधान आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे की, जर त्यांच्याकडे लपवण्यासारखे काही नसेल तर त्यांनी त्यांचे दावे सिद्ध करावेत आणि लेखातील प्रश्नांची उत्तरे पुराव्यांसह द्यावीत.
Dear EC,
You are a Constitutional body. Releasing unsigned, evasive notes to intermediaries is not the way to respond to serious questions.
If you have nothing to hide, answer the questions in my article and prove it by:
• Publishing consolidated, digital, machine-readable…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 7, 2025
सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी
राहुल गांधी निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तरानंतर आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे तुम्ही स्वाक्षरी नसलेल्या आणि माहिती देण्याची टाळाटाळ करणाऱ्या पत्रकांचे माध्यमांमार्फत वितरण करणे, हा गंभीर प्रश्नांना उत्तर देण्याचा योग्य मार्ग नाही. आपल्याला काहीही लपवायचे नसेल, तर माझ्या लेखातील प्रश्नांची थेट उत्तरे द्या. यासोबतच, लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी एकत्रित, डिजिटल आणि मशीन-रिडेबल मतदार यादी प्रकाशित करा. तसेच, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदान केंद्रांवरील संध्याकाळी ५ नंतरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा. टाळाटाळ केल्याने विश्वासार्हता टिकून राहणार नाही. सत्य सांगितल्यानेच ती दृढ होईल.”
How to steal an election?
Maharashtra assembly elections in 2024 were a blueprint for rigging democracy.
My article shows how this happened, step by step:
Step 1: Rig the panel for appointing the Election Commission
Step 2: Add fake voters to the roll
Step 3: Inflate voter… pic.twitter.com/ntCwtPVXTu— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 7, 2025
राहुल गांधींचे आरोप
शनिवारी, ७ जून रोजी इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखात, राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या पॅनेलमध्येही गैरप्रकार झाला होता. महाराष्ट्र निवडणुकीत तात्पुरत्या आणि अंतिम मतदानात ७ टक्क्यांहून अधिक फरक होता. असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. एक्सवर लेख शेअर करताना, राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीप्रमाणे बिहार निवडणुकीतही मॅच फिक्सिंग होऊ शकते.
निवडणूक आयोगाचे उत्तर
यानंतर राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने ते हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की, आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी काँग्रेसला पाठवलेल्या उत्तरात सर्व तथ्ये मांडली आहेत. ही माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. असे मुद्दे वारंवार उपस्थित करून या सर्व तथ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.