महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – दि. २७ ऑगस्ट – थोड्याच वेळात जीएसटी काऊंसिलची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जीएसटी कंपेनसेशनवर चर्चा होणार आहे. याआधी जाणून घ्या कोणत्या गोष्टींवर सरकारनं GST लागू केलेला नाही आहे.
सरकारने दूध, दही, नवीन यांसारख्या जीवनाश्यक वस्तूना GST स्लॅबमधून बाहेर ठेवले आहेत. यासह ताक, भाज्या, फळं, ब्रेड, अनपॅक्ड फूडग्रेन्स, गुळ, दूध, अंडी, दही, लस्सी, अनपॅक्ड पनीर, अनब्रांडेड पीठ, अनब्रांडेड मैदा, अनब्रांडेड बेसन, प्रसाद, काजळ, आणि मीठ यांचा समावेश आहे. याशिवाय फ्रेश मीट, मासे, चिकन यांच्यावरही GST नाही आहे. तसेच, लहान मुलांच्या वापरातील वस्तू, वर्तमानपत्र या गोष्टीही GST स्लॅबमध्ये नाही आहेत. यात लहान मुलांच्या चित्रकलेचे सामान जसे की, ड्राइंग बूक, कलरिग बूक आणि शिक्षण सेवांवरही GST नाही आहे.आरोग्य सेवा – सरकारने आरोग्य सेवाही शून्य टक्के जीएसटी अंतर्गत ठेवल्या आहेत.
ही उत्पादने देखील 0% GSTमध्ये- सॅनिटरी नॅपकिन्स, स्टोन, मार्बल, राखी, सालीची पानं लाकूड शिल्प आणि हस्तकलेच्या वस्तूंवर देखील शून्य टक्के जीएसटी आहेगेल्या वर्षी फ्रोजन भाजीपाल्यावरील कर काढून टाकण्यात आला होता. ही उत्पादने आता शून्य टक्के करांच्या खाली आली आहेत.संगीताशी संबंधित पुस्तकांवरही शून्य टक्के GST आहे.