महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जून ।। सावधान… मान्सून आगामी 72 तासांत राज्यात सक्रिय होणार आहे. संपूर्ण राज्यात तो जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत असून, कोकणला 13 ते 16 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून 26 मेपासून मुंबई, पुणे आणि अहिल्यानगर भागातच अडखळला होता. त्यामुळे विदर्भ अन् मराठवाड्यातही पाऊस कमी होता. विदर्भात अजूनही कमाल तापमान 44.2 अंशांवर गेले आहे. मात्र, 13 जूनपासून वातावरणात मोठे बदल होत असून, मान्सून वेगाने सक्रिय होत असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दि. 26 मे ते 10 जून असे एकूण 15 दिवस मान्सून अडखळला होता. मात्र, हवेचे दाब अनुकूल होत असल्याने आता राज्यात सर्वत्र पाऊस सुरू होणार आहे. (Latest Pune News)
देशात या भागांत सक्रिय होतोय मान्सून…
आगामी सात दिवसांत मान्सून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांसह झारखंड, अंदमान आणि निकोबार बेटे, पूर्व मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप या ठिकाणी जोरदार सक्रिय होत आहे. या सर्व भागांत सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटांसह पाऊस होणार आहे. 12 जूनपासून वार्यांचा वेग ताशी 50 ते 70 किमी इतका वाढणार आहे.
असे आहेत अलर्ट… (कंसात जूनमधील तारखा)
ऑरेंज अलर्ट : रायगड (14), रत्नागिरी (11 ते 13), सिंधुदुर्ग (12ते 14) पुणे घाट (12), पुणे (12), कोल्हापूर घाट (12 ते 14), कोल्हापूर (14), सातारा घाट (13,14), सांगली (12,13)
या शहरांसाठी असेल ‘यलो अलर्ट’
पालघर (14), ठाणे (12 ते 14), मुंबई (13,14), सोलापूर (11 ते 13), छ. संभाजीनगर (11 ते 14), जालना (11 ते 14), परभणी (11 ते 13), बीड (12 ते 14), हिंगोली (11 ते 13), लातूर (11 ते 13), धाराशीव (11 ते 14), अकोला, अमरावती, अकोला, भंडारा, बुलडाणा, यवतमाळ (11 ते 14), चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा (12 ते 14)