महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जून ।। रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता प्रवाशांची वेटिंग लिस्ट २४ तास आधीच तयार केली जाणार आहे.रेल्वेनं प्रवास करायचाय मात्र तुमचं तिकीट कन्फर्म नाहीये.तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण रेल्वेचा प्रतीक्षा यादीचा चार्ट (Waiting List Chart) आता 4 तासांऐवजी 24 तास आधीच तयार केला जाणारेय. ही योजना 6 जूनपासून बिकानेर विभागात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांत या प्रयोगाचे खूप सकारात्मक परिणाम दिसून आल्याचा दावा रेल्वे सूत्रांनी केलाय. पुढील काही दिवसांतच सुविधा अनेक मार्गावर सुरू केली जाण्याची शक्यता आहे.