Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Horoscope Today दि. १६ जून ; आज वैचारिक गोंधळ टाळावा..……..….…… ; पहा बारा राशींचं भविष्य — - Maharashtra 24

Horoscope Today दि. १६ जून ; आज वैचारिक गोंधळ टाळावा..……..….…… ; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जून ।।

मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
तुमचा मान-सन्मान वाढेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कामात वडीलांचा चांगला पाठिंबा मिळेल. मित्रांशी मतभेद वाढू शकतात. कामाबाबतच्या चिंता दूर होतील.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
आध्यात्मिक प्रगती साधता येईल. तुमच्याकडील ज्ञानाचे कौतुक केले जाईल. उपासनेत प्रगती कराल. उत्तम मानसिक शांतता लाभेल. हातातील संधी सोडू नका.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
फक्त स्वत:च्या फायद्याचा विचार करून चालणार नाही. काटकसरीने वागावे लागेल. वैचारिक गोंधळ टाळावा. मोहाला बळी पडू नका. अचानक धनलाभ संभवतो.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
भौतिक सुखाच्या मागे लागू नका. अती अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. फसवणुकीपासून सावध रहा. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
प्रकृतीची काळजी घ्यावी. आहाराचे योग्य पथ्य पाळावे. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराच्या इच्छेला मान द्यावा लागेल.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
कामात दिरंगाई जाणवू शकते. मुलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. सहकार्‍यांवर फार विसंबून राहू नका. काहीतरी नवीन शिकण्याची संधी लाभेल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापरावी.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कमिशनमधून चांगली कमाई करता येईल. जोडीदाराचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करा. रागाला आवर घालावी लागेल.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. व्यवसायात चांगली प्रगती करता येईल. घरात तुमचे प्रभुत्व राहील. भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात. दुचाकी वाहन जपून चालवावे.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
आवक जावक यांचा योग्य मेळ घालावा. कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. इतरांना मदत करण्याचा आनंद मिळवाल. तुमच्यातील दिलदारपणा दिसून येईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope )
मानसिक चिंता बाजूला साराव्यात. पारमार्थिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ पडेल. मनातील उदासवाणे विचार काढून टाका. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. तुमचा बौद्धिक कस लागू शकतो.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscopei)
पैशाची नड भागली जाईल. मोठ्या लोकांची ओळख होईल. व्यवसायातून चांगला नफा मिळवाल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *