महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जून ।। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. मे महिन्याचा हप्ता आल्यानंतर जूनचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, हा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये येण्याची शक्यता आहे.याबाबत कोणतीही अधिकृत नाहिती समोर आलेली नाही.
जूनचा हप्ता कधी येणार?
गेल्या अनेक महिन्यांपासून त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खात्यात पैसे जमा केले जात आहे. काही महिन्यात हा हप्ता त्याच्या पुढच्या महिन्यातदेखील दिला आहे. त्यामुळे जून महिन्याचाही हप्ता शेवटच्या आठवड्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, महिला व बालविकास विभागाने घोषणा केल्यानंतरच या गोष्टींवर विश्वास ठेवा.
लाडकींचे अर्ज होणार बाद
लाडकी बहीण योजनेतून हजारो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. यात काही सरकारी कर्मचारी असलेल्या महिला आहेत. तर काही महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे.त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. याचसोबत काही महिला इतर योजनांचाही लाभ घेत आहेत. त्यामुळे त्यांचेही अर्ज बाद केले जाणार आहेत. यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्यावर आता अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे.
लाडकींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा
लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे. हा हप्ता देण्यास उशिर झाला आहे. मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात देण्यात आला आहे. त्यामुळे जूनचा हप्तादेखील लांबला आहे. अजूनही जूनच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.