![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जून ।। विठुरायाचं दर्शन आता अवघ्या काही क्षणात होणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रशासनाने या अनुषंगाने पावलं उचलायला सुरुवात केलीय. तिरुपती मंदिरातील टोकन दर्शन व्यवस्था आता पंढरीत होणार आहे नेमकी कशी पाहुयात
महाराष्ट्रच(Maharashtra) नव्हे तर जगभरातील विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. बातमी विठ्ठलाच्या दर्शनाची. आता तासंतास अन् लांबलचक रांगेत ताटकळत उभे राहण्यापासून विठ्ठल भक्तांची सुटका होणारय. विठ्ठल मंदिर प्रशासनाने आता टोकण द्वारे विठुरायाच्या दर्शनाची सोय केली आहे. नेमकी ही सोय आहे तरी कशी पाहुयात
कसं मिळणार विठुरायचं टोकन दर्शन
www.vitthalrukminimandir.org या संकेत स्थळावर जावून दर्शनाची तारीख आणि वेळ बुक करावी. बूक केलेल्या टोकनची एक प्रिंट घ्यावी आणि मंदिराच्या शेजारी असणाऱ्या संत ज्ञानेश्वर मंडपात टोकनची पडताळणी करुन घ्यावी. त्यानंतर भाविकांना दर्शन हॉलमध्ये प्रवेश मिळणार. त्यानंतर वेळेनुसार थेट दर्शन रांगेत प्रवेश मिळणार आणि दर्शन होणार आहे.
खरं पाहिलं तर पांडुरंग महाराष्ट्राचं आराध्य दैवत. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान. युगे ठ्ठावीस विटेवर उभे असणाऱ्या पंढरीनाथाच्या समचरणावर माथा टेकवण्यासाठी लाखो भाविक पंढरीत येत असतात. प्रत्येक भाविकाला अन् वारकऱ्याला या सावळ्या विठुरायाचं दर्शन काही शक्य होत नाही. मात्र प्रशासनाकडून टोकनद्वारे दर्शनाची आणलेली योजना नक्की स्तुत्यपूर्ण आहे.
या योजनेची चाचणी १५ जूनला होतेय. यात जर त्रुटी आढळली नाही तर याचा फायदा लाखो वारकऱ्यांना नक्की होईल. शेवटी वारकऱ्यांना काय हवं असतं फक्त पांडुरंगाचं दर्शन. याच क्षणाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे प्रमाण आठवतं ते म्हणजे. तुका म्हणे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडिने
