Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Pimpri Market Update: पावसामुळे पालेभाज्यांचे भाव वधारले; फळभाज्यांचे दर झाले कमी - Maharashtra 24

Pimpri Market Update: पावसामुळे पालेभाज्यांचे भाव वधारले; फळभाज्यांचे दर झाले कमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जून ।। पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 15) पालेभाज्यांचे दर वाढले होते. मेथी 40-50 रूपये जुडी तर इतर पालेभाज्या 30 रूपये जुडी होत्या. तर फळभाज्यांचे दर या आठवड्यात कमी झाले आहेत. तर लसूण, कांदा, आले, टोमॅटो यांचे भाव स्थिर आहेत.


यामध्ये कांदा, लसूण, बटाटे यांचे दर स्थिर आहेत. लसूण 100 रूपये किलो तर कांदा आणि बटाट्याचे दर शंभर रूपये 4 किलो याप्रमाणे होते. टोमॅटो 25 रूपये प्रतिकिलो होते. आले 80 रूपये किलो आहे. (Latest Pimpri News)

फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे रविवारी बाजारात गवार (गावरान व सुरती) 100 रूपये प्रतिकिलो होती. शेवगा 100 रुपये किलो होता. टोमॅटो 20 – 25 रूपये, भेंडी 50 रूपये किलो, फ्लॉवर 40 रूपये, कोबी 40 रूपये, मिरची 50 रूपये, गाजर 60 रूपये, शिमला 80 रूपये, लसूण 80 – 100 रूपये, आले 60 रूपये, वांगी 40 रूपये, काकडी 50 रूपये, कारले 80, कांदे 100 रूपये 5 किलो, बटाटा 35 रूपये किलो, बिन्स 100 – 120 रूपये किलो, घेवडा 180 रूपये किलो, रताळी 60 रूपये, लाल भोपळा 80 रूपये , घोसाळी 60, लिंबू 150 रूपये, दोडका 120 रूपये, बिन्स 100 – 120 रूपये किलो, तोंडली 80 रूपये, आवळा 80, बीट 40 रूपये, दुधी 50, पापडी 100 – 150, वाटाणा 140 रूपये.

पिंपरी बाजारातील दर
पाले भाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी, कोथिंबीर 25 – 30 रूपये, मेथी 40- 50 रूपये, पालक 30 रूपये, शेपू 30 रूपये, पुदिना 15 रूपये, मुळा 30 रूपये, चवळई 30, लाल माठ 30, कांदापात 30 रूपये, करडई 20.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)
बीट 70, वाल 120, दोडका 140, कारली 100, भरताची वांगी 60, तोंडली 80 – 100, घोसळे 80, पडवळ 80, भोपळा 60, राजमा 100, पापडी 100, बीन्स 120 रूपये, परवल 60 ते 70, तोतापुरी 60 – 70 रूपये किलो, आवळा 100 रूपये किलो, रताळी 80 रूपये किलो, सुरण 100 रूपये, मद्रास काकडी 70 रूपये, आरबी 100 रूपये किलो, घेवडा 160 रूपये, सिमला 100 रूपये, फ्लॉवर 50 रूपये, कोबी 50 रूपये.

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा 11, बटाटा 15, लसूण 65, आले 30, भेंडी 45, गवार 65, टोमॅटो 20, वाटाणा 75, घेवडा 65, दोडका 55, हिरवी मिरची 35, दुधी भोपळा 35, काकडी 15, कारली 45, गाजर 25, फ्लॉवर 40, कोबी 20, वांगी 35, ढोबळी 45, बीट 20, शेवगा 70 प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)
फळभाजी 3868, पालेभाजी 38200 (गड्डी) , फळे आवक 336,कांदा 616, बटाटा 913, आले 55, लसूण 5, भेंडी 109, गवार 21, टोमॅटो 528, वाटाणा 6, घेवडा 33, दोडका 32, हिरवी मिरची 136, दुधी भोपळा 51, काकडी 159, कारली 32, डांगर 41, गाजर 66, फ्लॉवर 321, कोबी 127, वांगी 179, ढोबळी 55, बीट 30 ,शेवगा 33, कैरी 31, चवळी शेंग 21, लिंबू 45, मका कणीस 108 क्विंटल, अशी एकूण 3868 क्विंटल आवक झाली.

पालेभाजी दर जुडी, आवक (क्विंटल)
एकूण जुडी 38400, कोथिंबीर 26700, मेथी 2500, शेपू 2500, कांदापात 1500, पालक 3500. पुदीना 1700.कोथिंबीर 20 रूपये, मेथी 25, पालक, 18 रूपये, शेपू 18 रूपये, कांदापात 15 रूपये, पुदिना 10 रूपये,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *