Gold Rate 18 June 2025: सोन्याचा तोरा काही कमी नाही, पाहा आजचा भाव किती?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जून ।। अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे आणि ब्रोकरेज फर्म सिटीच्या संशोधन अहवालामुळे आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याची चमक कमी झाली आहे. औद्योगिक मागणीमुळे चांदीची चमक कमी होण्यापासून वाचली आणि ती सलग दुसऱ्या दिवशी महाग झाली आहे. आज सकाळी सोन्याच्या किंमत वाढलेली पाहायला मिळत आहे. MCX वर सोन्याची किंमत ही 99,620 रुपये इतकी आहे. सोन्याने मागील काही दिवसांत लाखाचा आकडा गाठला होता.

तीन दिवसांत सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 1320 रुपयांनी कमी झाली आहे. 22 कॅरेट सोने देखील स्वस्त झाले आहे आणि तीन दिवसांत ते प्रति दहा ग्रॅम 1210 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 92,500 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 1,00,910 रुपये आहे. आता चांदीबद्दल बोलायचे झाले तर, आज सलग दुसऱ्या दिवशी एक किलो चांदी महाग झाली आहे आणि या दोन दिवसांत त्याची किंमत 200 रुपयांनी वाढली आहे. आज, 18 जून रोजी, दिल्लीत चांदी प्रति किलो ₹ 1,10,100 ने विकली जात आहे. सोन्याची खरेदी खूप झाली आहे, मागणी कमकुवत आहे, अमेरिकन फेडकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे आणि इस्रायल आणि इराणमधील युद्ध थांबल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था वाढण्याची शक्यता आहे.

22 कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई 92,500 रुपये
92,000 रुपये
पुणे 92,500 रुपये
92,000 रुपये
नागपूर 92,500 रुपये 92,000 रुपये
कोल्हापूर 92,500 रुपये 92,000 रुपये
जळगाव 92,500 रुपये 92,000 रुपये
ठाणे 92,500 रुपये 92,000 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई 1,00,910 रुपये
1,00,370 रुपये
पुणे 1,00,910 रुपये 1,00,370 रुपये
नागपूर 1,00,910 रुपये
1,00,370 रुपये
कोल्हापूर 1,00,910 रुपये
1,00,370 रुपये
जळगाव 1,00,910 रुपये
1,00,370 रुपये
ठाणे 1,00,910 रुपये
1,00,370 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *