पुणे ; या भागात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – दि. २७ ऑगस्ट – मुठा खोऱ्यातील खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षाच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाला आहे. मात्र, प्रकल्पातील चारही धरणांमध्ये जवळपास गतवर्षी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला प्रकल्पात गतवर्षी २८.८७ टीएमसी (९८.०४ टक्के) पाणीसाठा होता. यंदा तो २८.६९ टीएमसी (९८.४२ टक्के) इतका आहे.

खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षी २६ ऑगस्टपर्यंत ४ हजार १७१ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा २ हजार ४९४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वरसगाव धरणाच्या पाणलोटात गतवर्षी २ हजार ९१२ मिमी तर यंदा १ हजार ७८९ मिमी पाऊस झाला. पानशेत धरणाच्या पाणलोटात गतवर्षी २ हजार ९३६ मिमी तर, यंदा १ हजार ८६८ मिमी पावसाची नोंद झाली. वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तीन धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. दरम्यान, बुधवारी दिवसभरात सायंकाळपर्यंत टेमघर आणि वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रत्येकी दोन मिमी तसेच पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक मिमी पावसाची नोंद झाली.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये कंसात टक्केवारी
टेमघर – ३.२५ (८७.६२)
वरसगाव – १२.८२ (१००)
पानशेत – १०.६५ (१००)
खडकवासला १.९७ (१००)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *