Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Horoscope Today दि. २५ जून ; आज क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका.....…… ; पहा बारा राशींचं भविष्य — - Maharashtra 24

Horoscope Today दि. २५ जून ; आज क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका…..…… ; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जून ।।

मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
उगाच कसली तरी कमतरता जाणवेल. मनातील चुकीच्या विचारांना आवर घालावी लागेल. कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
कौटुंबिक रूसवे-फुगवे दूर करावे लागतील. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कामात सहकार्‍यांची मदत मिळेल. परिस्थितीनुसार कामात काही बदल करावे लागतील. मैत्रीतील जिव्हाळा वाढीस लागेल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
इतरांवर विसंबून राहू नका. गप्पा मारण्यात वेळ वाया घालवून चालणार नाही. लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. जोडीदाराच्या सौख्याला बहर येईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
प्रतिकूलतेतून कष्टाने कामे करत राहाल. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. अपुरी कामे पूर्णत्वास जातील. जवळचे मित्र भेटतील.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
मनोरंजनातून आनंद घ्याल. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. सढळ हाताने मदत कराल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. विरोधकांवर लक्ष ठेवावे

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
अपचनाचा त्रास जाणवेल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक गोष्टीत संयम बाळगावा. जवळच्या प्रवासाचे योग आहेत. शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. कामात नवीन पर्यायांचा अवलंब करावा.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील. अनावश्यक खर्चावर ताबा ठेवावा. मनात नसत्या शंका आणू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
मुलांचे वागणे त्रासदायक वाटू शकते. भौतिक गोष्टींवर अधिक खर्च कराल. शिस्तीचा फार बडगा करून चालणार नाही. मित्रांकडून कौतुक केले जाईल. प्रवास सावधानतेने करावा.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
कामात उगाचच खो बसल्यासारखा वाटू शकतो. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नको. थोडी चिडचिड कमी करावी. जुन्या गोष्टी मनाला दुखवू शकतात. अति विचार करू नका.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
दुराग्रहीपणे निर्णय घेऊ नका. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. घरगुती कामात रमून जाल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. घरासाठी काही नवीन वस्तु खरेदी केल्या जातील.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
मनावरील ताण दूर सारावा. कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढावा. घरी मोठ्या लोकांची ऊठबस राहील. सामाजिक जाणि‍वेतून काम कराल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *