![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जून ।। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पडला आहे. सर्वजण जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, जून महिना संपायला अवघे १० दिवस उरले आहेत. त्यामुळे अनेकजण जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारत आहेत. पुढच्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला दिला होता. त्यानंतर जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहे. महिना अखेरपर्यंत म्हणजे पुढच्या दोन आठवड्यात हे पैसे दिले जाऊ शकतात. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाहेर जाऊन अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज आता बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना पैसे मिळणार नाहीत. या योजनेसाठी सुरुवातीपासूनच काही नियम निश्चित करण्यात आले होते.
या योजनेत फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेतील महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या घरी चारचाकी वाहन नसावे. महिला सरकारी कर्मचारी नसावे, या सर्व निकषात जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.
