महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २८ ऑगस्ट – अर्थव्यवस्था विषयी गांभीर्याने विचार करून सरकारने पुढील पावले उचलली पाहिजेत , लाॅकडावून मुळे झालेले देशाचे नुकसान कसे भरून काढता येईल या गोष्टींवर विचार करून जनतेची आर्थिक परीस्थिती कशी पुर्व पदावर येईल या कडे सरकरने प्राधान्य दिले पाहिजे. अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी सर्वात आधी जनतेला लाॅकडावून च्या कालावधीचे कर्जावरील व्याज माफ केले पाहिजे. सरकारने व्याज माफ केले तर जनता आर्थिक चिंतेतून मुक्त होईल आणि फ्रेश मुड मध्ये कामाला लागेल जेणे करून अर्थव्यवस्थेला गती मिळेल…..कारण लाॅकडावून मुळे लोक अर्थहीन झालेत. थोडक्यात गरीब व मध्यम वर्गाची जनता भिकेला च लागायची राहीली आहे.सरकारने या कडे गांभीर्याने बघीतले पाहिजे कारण सरकारने देश लाॅकडावून केल्यामुळे च जनतेचे काम धंदे बंद झाले परिणामी जनतेचे उत्पन्न बंद झाले त्या मुळे त्यांचे कर्जाचे हप्ते थकलेत, यात जनतेचे काय चुकी आहे ? चुकी सरकारची नाही आणि जनतेचे ही नाही हे राष्ट्रीय संकट आहे.
म्हणून याची जबाबदारी देशाने म्हणजेच सरकारने म्हणजेच रिझर्व्ह बँकेने याची जबाबदारी घेतली पाहिजे. रिझर्व्ह बँकेनेच व्याज माफ केले पाहिजे. प्रश्न असा आहे की इतके वर्ष रिझर्व्ह बँकेने काय केले? खर तर रिझर्व्ह बँक ने खुप नफा कमावला आणि त्यातूनच कितीतरी मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यात आले,सदर दोषी कर्जदारांची कर्जांची थकबाकी रिझर्व्ह बँकेने वसुल न होणारी कर्ज दाखवून जवळजवळ माफच केली आहेत. आणि ह्या गोष्टी जगजाहीर झाल्या आहेत तरी रिझर्व्ह बँक “चोर तर चोर वरून शिरजोर” दाखवायचा प्रयत्न करत आहे.
रिझर्व्ह बँकेची परीस्थिती आर्थिक दृष्ट्या नाजूक होती तर रिझर्व्ह बँके जनतेला न विचारता सरकारला का म्हणून वेळोवेळी पैसे पूरवते, तेव्हा जनतेला विचारते का? जनतेच्या हितासाठी स्थापन झालेली बँक जनतेला च कठीण परिस्थितीत मदत करत नाही..व्याज माफ करत नाही, जनता म्हणत नाही हप्ते माफ करा अरे व्याज तर माफी करा. रिझर्व्ह बँक व्याज दर सोडाच वरून व्याजावर व्याज लावायला निघाली आहे..इतका निर्लज्ज पणा वेळप्रसंगी खाजगी सावकार ही करत नसेल त्याला तरी दया येवू शकते..पण रिझर्व्ह बँकेला जनतेची दया येत नाही.म्हणूण सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला व सरकारला खडसावले आहे की सरकारनेच देश लाॅकडावून केला जनतेने नाही., म्हणून रिझर्व्ह बँकेने जनतेला व्याज माफ केलेच पाहिजे नाहीतर जनता हे उपकार विसरू शकत नाही. केलेल्या कर्माची फळे ही मिळणारच.