कामाची बातमी : रेल्वेत 6 हजार पदांसाठी भरती, 28 जूनपासून 28 जुलैपर्यंत अर्ज भरता येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जून ।। रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळ (आरआरबी) ने तब्बल 6 हजार पदांसाठी नोकर भरती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने या भरती मोहिमे अंतर्गत संपूर्ण भारतात 6 हजार 180 पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया येत्या 28 जून 2025 पासून सुरू होणार असून 28 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 180 पदे ही तंत्रज्ञ ग्रेड 1 सिग्नल या पदांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तर बाकीची 6 हजार पदे ही तंत्रज्ञ ग्रेड 3 पदासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत भरती पोर्टल www.rrbapply.gov.in यावर देण्यात आली आहे.

काय आहे पात्रता?
टेक्निशयन ग्रेड 1 सिग्नल पदासाठी उमेदवाराकडे भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, इन्स्टमेंटेशनलमध्ये विज्ञान पदवी असणे आवश्यक आहे किंवा संबंधित विषयात अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 29,200 रुपये मासिक वेतन आणि 7 व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार अतिरिक्त भत्ते आणि अन्य लाभ दिले जातील. टेक्निशियन ग्रेड 3 पदासाठी उमेदवार कमीत कमी 10 वी पास असणे गरेजेच आहे. तसेच त्याने फाऊंड्रीमन, मोल्डर, पॅटर्न मेकर, फोर्जर, हिट ट्रिटर यासारख्या ट्रेडमध्ये आयटीआय किंवा अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार
रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱयांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीची असेल. रेल्वेच्या या निर्णयामुळे राजपत्रित नसलेल्या कर्मचाऱयांना निवृत्तीनंतरही रेल्वेत काम करता येईल. रेल्वेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सोपी करणे, कार्यक्षमता वाढवणे आणि अनुभवी कर्मचाऱ्यांमार्फत सेवा सुधारण्यासाठी याची मदत होईल, यामुळे हा निर्णय घेतला आहे, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *